जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर येथे "वसुंधरा दिना"निमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली ।। .
🌳*वसुंधरा आणि मानव*🌳
आज जागतिक वसुंधरा दिवस आहे. यामुळे आज आपण वसुंधरा मानवासाठी कशी महत्वाची आणि उपयुक्त आहे याविषयी चिंतन करण्याची वेळ आल्या सर्वांवर कोरोना सारख्या आजाराने आणली आहे
"*वसुंधरा ही सर्व मानवांची गरज पूर्ण करू शकते, परंतु एकाचीही हाव पूर्ण करू शकत नाही.* "
*महात्मा गांधी.*
वरील वाक्य आपल्याला खूप काही सांगून जाते यावर आपण लक्ष देऊन आचरण करणे गरजेचे आहे.
ही सर्व सुष्ट्री आपल्यासाठी बनलेली आहे, निसर्गामध्ये बनलेली ही प्रत्येक गोष्ट ही आपल्या आनंदासाठी बनलेली आहे. त्यांचा आपण आनंद घ्यावा असे निसर्गाला अपेक्षित आहे.
परंतु ज्यावेळी मानवाने आपली हाव पूर्ण करण्यासाठी बेसूमार निसर्गाचा वापर केला. परंतु मानव हा निसर्गाचे संवर्धन करायला विसरला. बेसूमार वृक्षतोड केली, परंतु वृक्ष संवर्धन तो विसरला, पाण्याचा अमर्यादित वापर केला परंतु, त्याचे संवर्धन तो विसरला,बेसूमार डोंगर फोडले गेले, नदीमध्ये गटारीचे पाणी आणि औषधी पाणी सोडले गेले, सर्व प्रकारचे प्रदूषण अमर्यादित केले गेले, परंतु याचे नियोजन करून संवर्धन करायला मानव सपशेल विसरला.
यामुळे जागतिक तापमान वाढ, कोरोना सारखे रोग, अनियमित पाऊस, दूषित हवा, नदी, समुद्र दूषित होऊन वसुंधरेचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि यामुळे समस्थ मानव समाज धोक्यात आला आहे.
युनोच्या महासभेने दरवर्षी २२ एप्रिल हा *दिवस "जागतिक वसुंधरा दिन* " म्हणून जाहीर केला.
२०२१ ची जागतिक घोषणा आहे *"आपल्या वसुंधरेला पुर्ववत करा".*
*वसुंधरेला पूर्ववत करण्यासाठी वृक्ष संवर्धन, जल नियोजन, प्रदूषण मुक्ती* यासारखे महत्वाकांशी कार्य करावे लागणार आहेत.
यासाठी आज आपण संकल्प करूयात की मी दर वर्षी काही झाडें, पाण्याचा योग्य वापर, आणि मी कुठेही कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणार नाही.
🌴🌳या वसुंधरेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कार्य सुरु करू🌳🌲
श्रीम. भोर ज्योती मारूती






Comments
Post a Comment