निसर्ग व पर्यावरण बाल ई- साहित्य संमेलन

*दत्तनगर शाळेचे निसर्ग व पर्यावरण ई बालसाहित्य संमेलन* नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर येथे वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या प्रेरणेने शिक्षिका ज्योती भोर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण व्हावी यासाठी ऑनलाइन ई-बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले . सध्या कोरोनामुळे ऑक्सिजनला किती अनन्य साधारण महत्त्व आहे . याची जाणीव निसर्गाने करून दिली आहे . पर्यावरण रक्षण व वृक्ष संवर्धनाबाबत मुलांनी बालपणापासूनच जागृत व्हावे . हा उद्देश समोर ठेवण्यात आला . यामध्ये मुलांनी निसर्गातील स्व अनुभव , स्वरचित कविता सादरीकरण , पर्यावरण जागृतीवर चित्रे , पोष्टर्स , घोषवाक्ये, एक झाड तुझे एक झाड माझे, पक्षी , झाडे , पृथ्वी , हवा , प्लास्टिक वापर हानिकारक या विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . शिक्षिका ज्योती भोर व मंजुषा आवारे यांनी मुलांना मार्गदर्शन केले . ज्येष्ठ साहित्यिक डॉ संजय कळमकर सरांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला . तर जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी मुलांचे कौतुक केले . सभापती सुरेखाताई गुंड यांनी बालसंमेलनास शुभेच्छा दिल्या . तर उपसभापती डॉ दिलीप पवार यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले . याप्रसंगी वृक्षमित्र आबासाहेब मोरे , जि.प.सदस्य मा.संदेशजी कार्ले साहेब सभापती सौ. सुरेखाताई गुंड , उपसभापती श्री . दिलीप पवार , ज्येष्ठ साहित्यिक डॉ .श्री . संजय कळमकर , गटशिक्षणाधिकारी श्री .चंद्रकात सोनार साहेब , विस्ताराधिकारी श्री .रविंद्र कापरे साहेब , केंद्रप्रमुख मा श्री धामणे साहेब , मा .सरपंच हरिभाऊ कर्डिले , सरपंच मंगल गवळी , उपसरपंच आदिनाथ मोढवे पालक व विद्यार्थी यांनी ऑनलाईन उपस्थिती दाखवून संमेलनात सहभाग घेतला .
oPxnr95C8Jf2gCLcBGAsYHQ/s320/Screenshot_2021-04-15-13-38-56-57.jpg"/>

Comments