पर्यावरण रक्षण काळाची गरज

चिव चिव करत आली अंगणात चिऊताई.... चारापाणी ठेवा म्हणत करु लागली भलतीच घाई. .!!1!! सांगु लागली तिच्या स्वरात खुप भटकले हो मी वणवण... चारापाणी नाही मिळाले पन अंगात आली हो खुप कणकण... घासभर द्या हो अन्नपाणी त्राण माझ्या अंगात येईल... माझ्या घरट्यातील पिलांनाही जाताना थोडसं घेऊन जाईल..... जाता जाता म्हणते कशी ताई सांगु का एक गोष्ट कानात.... खुप छान डेरेदार झाड होतं हो याआधी तुमच्या दारात..... कुर-हाडीचा चांगलाच त्याच्यावर घाव घातला..... त्याजागी तुमचा हा सुंदर बंगला बांधला.... म्हणते कशी कष्ट घ्याल का तुम्ही दारात झाड लावण्याचं.... सौंदर्य वाढेल नक्कीच तुमच्या या सुंदर बंगल्याचं...... म्हणते लावा दारात झाड छानसं खेळतील हो माझी लेकरं.... विसावया निवांत येतील अजुन दुसरीही पाखरं...... तसदी घेऊ आपण सारे एकतरी झाड लावुन संगोपन करण्याची. शपथ घेऊ सारे मिळुनी पर्यावरणाला वाचवण्याची....

Comments

Post a Comment